Wakad Crime News : बनावट चहा पावडर विक्री प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अनधिकृतपणे चहा पावडर बनवून ती एका ब्रँडेड कंपनीची असल्याचे भासवून तसा लोगो वापरून चहा आणि अन्य आठ प्रकारची उत्पादने विकल्याचे प्रकार रहाटणी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीने दिलेल्या तक्रारीनुसार एका तरुणाच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 420, कॉपीराईट अधिनियम 1957 चे कलम 51 (बी), 63 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतापराम ताजाराम चौधरी (वय 28, रा. रामनगर, रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सचिन रमेश गोसावी (वय 40, रा. खार, मुंबई) यांनी शनिवारी (दि. 23) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीत नोकरी करतात. आरोपीने हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड नावाचे अधिकृत मॅन्युफॅक्चरिंग नसलेले परंतु हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीच्या नावाचा बनावट लोगो वापरून तयार केलेला रेड लेबल चहा पावडर माल आणि इतर आठ प्रकारची उत्पादने ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने दुकानात ठेवली.

दरम्यान, आरोपीकडे 70 हजार 442 रुपयांचा बनावट मुद्देमाल आढळून आला आहे. आरोपीने कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केले आहे. याबाबत हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीकडून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.