Woman beaten in Pimpri : किरकोळ कारणावरून महिलेला मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – नळावर लहान मुलाने पाणी उडविले, म्हणून महिलेने (Woman beaten in Pimpri) त्या लहान मुलाला विचारणा करून घरी जाण्यास सांगितले. या कारणावरून सहा जणांनी महिलेला हाताने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 4 मे) सकाळी रमाबाईनगर, पिंपरी येथे घडली.

Pune Sub Regional Transport : पुणे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जप्त वाहनांचा ई-लिलाव

रेखा सुरज चंदनशिवे (वय 33, रा. रमाबाई नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस (Woman beaten in Pimpri) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, श्रीकांत ईश्वर सोनवणे (वय 45) आणि त्याच्या घरातील पाच नातेवाईक महिला (सर्व रा. रमाबाईनगर, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Woman beaten in Pimpri: Woman beaten for petty reasons; Charges filed against six persons

Bhosari News : मंडल अधिकारी महिलेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी ; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

महिलेला जीवे मारण्याची धमकी –

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी रेखा या त्यांच्या राहत्या घरासमोर सार्वजनिक नळावर कपडे धूत होत्या. त्यावेळी पाठीमागील गल्लीतील नऊ वर्षीय लहान मुलगा पाण्यामध्ये खेळत होता. यावेळी नळाचे पाणी त्याने उडवले. यामुळे फिर्यादी रेखा यांनी मुलाला ‘घरी जा’ असे म्हटले.  त्यानंतर आरोपींनी आपसात संगनमत करून एकत्र येऊन फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी दोन महिला आरोपींपैकी एकीने लोखंडी रॉड आणि दुसरीने मारण्यासाठी वीट उगारली. या गुन्ह्याचा अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.