Pune News : पुण्यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून प्राचार्यांची आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील औंध परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या प्राचार्य असलेल्या एका व्यक्तीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गजानन वैजनाथ परीथवाड (वय 60) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. सोमवारी रात्री 10 वाजता ही घटना घडली. 

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, औंधमधील नागरस रस्त्यावरील हर्ष पैराडाईज या सोसायटीमध्ये गजानन परीथवाड राहत होते. सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने ही घटना पाहिली. त्याने याबाबत सोसायटीतील नागरीकांना माहिती दिली. त्यानंतर सोसायटीच्या इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान सोसायटीतील रहिवासी असणाऱ्या एका डॉक्टरांनी त्यांना तपासले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परीथवाड यांना दोन मुले असून दोघेही परदेशात असतात. पुण्यात ते पत्नीसोबत राहत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.