Sangvi : दहावीचा निकाल आणण्यासाठी गेलेल्या मुलाचे अपहरण

एमपीसी न्यूज – दहावीचा निकाल आणण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय मुलाला अज्ञातांनी अपहरण केले. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी बाराच्या सुमारास सांगवी येथे घडली.

याप्रकरणी मुलाच्या 65 वर्षीय आजोबांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आजोबांचा 16 वर्षीय नातू दहावीला होता. त्याने दहावीची परीक्षा दिली. शनिवारी (दि. 8) दहावीचा निकाल होता. निकाल आणण्यासाठी नातू दुपारी बाराच्या सुमारास घराबाहेर पडला. मात्र, संध्याकाळ झाली तरी घरी परतला नाही.

रात्र उलटून दुपार टळली तरी नातू घरी न आल्याने त्याच्या आजोबांनी रविवारी दुपारी सांगवी पोलीस ठाण्यात नातवाच्या अपहरणाचा गुन्हा नोंदवला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.