Pune News : सराईत गुंड अरबाज पटेल औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध

एमपीसी न्यूज : पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारा सराईत गुन्हेगार अरबाज आयुब पटेल (वय 23 वर्ष ) याला 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. अरबाज पटेल हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

त्याने अनेकदा त्याच्या साथीदारासह विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोयता, तलवार या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न तसेच नागरिकांना गंभीर दुखापत करणे त्याचबरोबर परिसरात दंगा करणे आणि बेकायदेशीररित्या हत्यार बाळगणे यासारखे अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. मागील 5 वर्षात त्याच्याविरोधात एकूण 05 गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान त्याच्या या गुन्हेगारीमुळे परिसरातील सार्वजनिक व्यवस्थेत मोठी अडचण येत असे. त्याची दहशत इतकी होती की आपली देखील जिवीत किंवा मालमत्तेची हानी होईल म्हणून परिसरातील रहिवाशी त्याच्याविरोधात तक्रार देखील करत नव्हते अशा अनेक बाबी लक्षात घेत पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आरोपीच्या विरोधात औरंगाबाद येथे 1 वर्षाकरिता स्थानबद्धतेचे आदेश पारीत केले आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांविरोधात कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे, त्यानुसार मागील एका वर्षात त्यांनी 53 अट्टल गुन्हेगारांना या कायद्या अंतर्गत स्थानबद्ध केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.