Dagdusheth Ganpati Mandir : दगडूशेठ’ गणपती मंदिर परिसरातील भक्तांच्या सोयींकरिता शरद पवार यांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी दुपारी 3.30 च्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Ganpati Mandir) मंदिराला भेट दिली. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविक महिलांकरीता स्वच्छतागृह, स्तनपान कक्ष, प्रथमोपचार सुविधा परिसरात कशा प्रकारे उपलब्ध होईल, याविषयी यावेळी चर्चा देखील झाली. त्यानंतर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शरद पवार यांनी गणरायाचे मुखदर्शन घेतल्यानंतर शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा ट्रस्टतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Dagdusheth Ganpati Mandir) सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि  सुवर्णयुग तरुण मंडळाचे विश्वस्त व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे, अमोल केदारी यांसह मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, राजाभाऊ घोडके आदींनी शरद पवार व दिलीप वळसे पाटील यांचा सन्मान केला. महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन त्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले.

शुक्रवारी दुपारी शरद पवार, दिलीप वळसे पाटील, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांसह अनेक मान्यवरांनी या परिसराला भेट दिली. सुरुवातीला मंदिरासमोर असलेल्या भिडे वाडयाची पाहणी करुन सर्व मान्यवरांनी मंदिराच्या मागील बाजूस गणपती सदन या ट्रस्टच्या इमारतीसमोरील जागेची पाहणी करुन तेथील अडचणी समजून घेतल्या. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविक महिला, लहान मुले यांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांची माहिती घेत त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.