India Corona Update : देशात दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 13.11 टक्क्यांवर

गेल्या चोवीस तासात दोन लाख 47 हजार 417 नवे कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज – देशातील दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. तो सध्या 13.11 टक्क्यांवर गेला आहे. तर मागील 24 तासात दोन लाख 47 हजार 417 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

देशात मागील सोळा दिवसांमध्ये 39 पटींनी दैनंदिन रुग्णवाढ झाली आहे. 28 डिसेंबर रोजी 6 हजार 358 रुग्ण आढळले होते. त्यानंतर दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ होत आहे. बुधवारी सकाळी आलेल्या माहितीत 24 तासात एक लाख 94 हजार 720 रुग्ण होते. एका दिवसात या रुग्ण संख्येत वाढ होत ही संख्या दैनंदिन अडीच लाखांच्या घरात गेली आहे.

 भारतातील कोरोना बाबतची महत्त्वाची आकडेवारी –

# चोवीस तासात दोन लाख 47 हजार 417 नवीन रुग्ण

# 24 तासात 380 रुग्णांचा मृत्यू

# दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 13.11 टक्के

# साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 10.80 टक्के

# सध्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण 3.08 टक्के

# सक्रिय रुग्ण संख्या 11 लाख 17 हजार 531

# बरे होण्याचे प्रमाण 95.59 टक्के

# 24 तासात 76 लाख 32 हजार 24 डोस देण्यात आले

# 24 तासात 84 हजार 825 जण बरे झाले

# आतापर्यंत तीन कोटी 47 लाख 15 हजार 361 जण बरे झाले

# आतापर्यंत देशात एकूण 70.73 कोटी टेस्टिंग झाले

# आतापर्यंत 154 कोटी 61 लाख 39 हजार 465 लस मात्रा देण्यात आल्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.