Dehugaon News : जबरदस्तीने पळवलेल्या एटीएमद्वारे चोरट्यांनी केली सोने खरेदी; एटीएममधून रोख रक्कमही काढली

एमपीसी न्यूज – एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचे एटीएम जबरदस्तीने घेउंत ते चोरून नेले. त्यांनतर त्या एटीएम द्वारे देहूगाव येथील एका सोना-या दुकानात 99 हजारांची सोने खरेदी केली. तसेच दहा वेळा एटीएम कार्डवापरून एक लाख रुपये काढले. हा प्रकार रविवारी (दि. 24) सकाळी देहूगाव येथे घडला.

संजय प्रकाश डवले (वय 35, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रविवारी सकाळी अकरा वाजता देहुगावातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले. एटीएम मध्ये पैसे काढण्याची प्रकिया करूनही एटीएम मधून पैसे आले नाहीत. त्यामुळे फिर्यादी काही वेळ तिथेच थांबले. त्यावेळी त्यांच्या जवळ थांबलेल्या दोघांनी फिर्यादी यांना त्यांचे एटीएम कार्ड दाखवा असे म्हटले. मात्र फिर्यादी यांनी एटीएम कार्ड दाखवण्यास नकार दिला.

त्यानंतर दोघांनी फिर्यादी यांच्या हातातून एटीएम कार्ड जबरदस्तीने हिसकावले आणि पळून गेले. देहूगाव येथील गौतम ज्वेलर्स या दुकानातून चोरट्यांनी फिर्यादी यांच्या एटीएम द्वारे 99 हजारांचे सोने खरेदी केले. त्यानंतर माळवाडी येथील एटीएम मध्ये प्रत्येकी 10 हजार रुपये प्रमाणे 10 वेळा एकूण एक लाख रुपये काढले. यामध्ये फिर्यादी यांच्या एटीएम मधून चोरट्यांनी एक लाख 99 हजारांची चोरी केली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.