Chakan News : आसरा देण्याच्या बहाण्याने सुरक्षा रक्षकाने केला महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – बॉयफ्रेंड सोबत भांडण करून चाकण बस स्थानकावर आलेल्या महिलेला एसटी स्थानकावर न थांबण्याची सुरक्षा रक्षकाने विनंती केली. एसटी स्थानकावर बेवडे असतात, तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो, असे सांगून सुरक्षा रक्षकाने महिलेला त्याच्या खोलीवर आसरा देण्यासाठी नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार रविवारी (दि. 24) मध्यरात्री सव्वादोन वाजता नाणेकरवाडी आणि चाकण एसटी स्थानकावर घडला.

याप्रकरणी पिडीत 27 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या बॉयफ्रेंड सोबत राहत आहे. फोनवर बोलण्याच्या कारणावरून त्या दोघांचे भांडण झाले. त्यामुळे रागाने फिर्यादी महिला तिच्या मुलाला घेऊन चाकण एसटी स्थानकावर आली. तिथे काम करणा-या सुरक्षा रक्षकाने फिर्यादी यांना पाहिले. ‘इथे बेवडे, खावडे असतात. तुम्ही येथे थांबू नका’ असे आरोपी सुरक्षा रक्षकाने म्हटले.

त्यावर फिर्यादी यांनी ‘मला घरी जायचे नाही’ असे सांगितले. याचा गैरफायदा घेऊन सुरक्षा रक्षकाने फिर्यादी महिलेला त्याच्या खोलीवर रात्रभर थांबण्याची विनंती केली. महिलेला आसरा देण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी नेले. रात्री महिला झोपेत असताना आरोपी खोलीत आला. त्याने महिलेवर बलात्कार केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.