Chinchwad News : पोलीस शिपायाला मारहाण, सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांना अटक 

एमपीसी न्यूज – पोलीस शिपायाला मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. मैदानावर सुरू असलेली भांडणं सोडविण्यासाठी गेले असताना हा प्रकार घडला. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड येथे गुरुवारी (दि.14) ही घटना घडली. 

प्रितम उर्फ बिक्षु नंदु आवतारे (वय 22, रा. थेरगाव), गौरव उर्फ कैची ज्योतीराम जोगदंड (वय 19) आणि आकाश शिवाजी आवतारे (वय 20) (रा. दळवीनगर, चिंचवड) असे अटक आरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई उमेश देवचंद वानखेडे यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दळवीनगर झोपडपट्टी येथील मोकळ्या जागेत कोणत्यातरी कारणावरून भांडत होते. फिर्यादी हे भांडणं सोडविण्यासाठी त्याठिकाणी गेले. पोलीस आहे असे सांगून सुद्धा आरोपींनी फिर्यादी व त्यांचे सहकारी यांना दगड आणि लाथांनी मारहाण केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.