Vehicle Theft : चाकण मधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण परिसरातून दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत रविवारी (दि. 5) चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत आकाश माणिक लांडगे (वय 27, रा. आदर्शनगर, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी शुक्रवारी (दि. 3) सकाळी दहा वाजता आंबेठाण चौकातील एका बॅंकेजवळ पार्क केली होती. अर्ध्या तासाच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.

दुस-या घटनेत अक्षय रावसाहेब हांडे (वय 27, रा. पिंपळेगुरव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी शनिवारी (दि. 4) सकाळी दहा वाजता आळंदी फाटा नाणेकरवाडी येथील एका वर्कशॉप समोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. दुपारी साडेबारा वाजता हा प्रकार उघडकीस आला. दोन्ही गुन्ह्यांच्या तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.