Pune News : दोन पिस्टल व सहा जिवंत काडतुसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज –  बावधन येथील शिवसेना चौक य़ेथून एका 29 वर्षीय तरुणाला दोन पिस्टल व सहा जिवंत काडतुसासह पोलिसांनी अटक केली आहे. (Pune News) ही कारवाई शनिवारी (दि.14) संध्याकाळी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने केली आहे.

संदिप अनंता भुंडे (वय 29 रा. बावधन ) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस शिपाई गणेश सावंत यांनी फिर्याद दिली आहे.

Pimpri Crime : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्यावर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथील शिवसेना चौकात एक जण शस्त्रासह उभा असल्याची खबर मिळाल्या नंतर पोलिसांनी शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले.(Pune News) यावेळी आरोपीकडून 70 हजार रुपयांच्या दोन पिस्टल व 1 हजार 800 रुपयांचे सहा जिवंत काडतुसे असा एकूण 71 हजार 800 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.