The Russia-Ukraine War : युक्रेनच्या जमिनीवर अमेरिकेचं सैन्य उतरणार नाही, पण आर्थिक निर्बंध लादून रशियाची कोंडी करणार- जो बायडेन

एमपीसी न्यूज : अमेरिकन संसदेला संबोधित करताना अध्यक्ष बायडन यांनी सुरुवातीलाच रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाबद्दल भूमिका मांडली. युक्रेनवर लादलेल्या युद्धाबद्दल बायडन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर टीका केली. तर युक्रेनच्या नागरिकांच्या लढाऊ बाण्याचं कौतूक करत युक्रेनच्या पाठिशी ठामपणे उभं असल्याचं आश्वासन दिलं. आर्थिक निर्बंध लादून रशियाची मोठी कोंडी करणार असल्याची घोषणा केली आहे. रशियन विमानांसाठी अमेरिकेची हवाई हद्द बंद करणार असल्याचंही सांगितलं.

  महत्त्वाचे मुद्दे,

  • बायडन यांनी युक्रेनच्या लढ्याचं कौतुक केलं आहे. आर्थिक निर्बंध लादून रशियाची मोठी कोंडी करणार असल्याची घोषणा केली आहे. रशियन विमानांसाठी अमेरिकेची हवाई हद्द बंद करणार असल्याचंही सांगितलं.
  • युक्रेनच्या जमिनीवर अमेरिकेचं सैन्य उतरवणार नाही, नाटो संरक्षणासाठी कटीबद्ध असल्याचा निर्वाळा दिला.
  • अमेरिका युक्रेनला एक बिलीयन डॉलरचं अर्थसहाय्य करणार असून आम्ही युक्रेनसोबत आहोत. We Stand With You! अशी ठाम घोषणा केली आहे.
  • रशियाच्या सध्याच्या आर्थिक दुरावस्थेला फक्त व्लादिमीर पुतिनच जबाबदार असल्याचं छातीठोकपणे सांगितलं.
  • जेव्हा या कालखंडाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा पुतिनच्या युक्रेनवरील युद्धामुळे रशिया कमकुवत झाल्याचं लिहलं जाईल आणि उर्वरित जग अधिक मजबूत होईल.
  • सध्या रशियाचं स्टॉक मार्केट कोसळलं असून इतर मार्केट्समध्ये रशियन स्टॉक्सवर बंदी आहे.
  • आमच्या मित्रपक्षांसह, आम्ही युक्रेनियन लोकांना त्यांच्या स्वातंत्र्याच्या या लढ्यात पाठिंबा देत आहोत. लष्करी मदत, आर्थिक मदत, मानवतावादी मदत अशा स्वरुपाच्या मदत आम्ही देऊ आणि मदत करतच राहू. कारण ते त्यांच्या देशाचे रक्षण करत आहेत आणि त्यांचं आताचं दु:ख कमी करण्याचं काम आमची ही मदत करेल.
  • राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना वाटलं की ते युक्रेनमध्ये घूसू शकतात आणि कसंही जग फिरु शकतात. मात्र, त्यांनी कधीही कल्पना केली नसेल अशी मजबूत भिंतीशी त्यांना सामना करावा लागला. कारण त्यांची भेट युक्रेनियन लोकांशी झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.