India Corona Update : चिंताजनक! देशात सलग दुसऱ्या दिवशी मृतांची संख्या अधिक 

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना, दुसरीकडे मृतांची संख्या वाढत आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशात आजवरच्या उच्चांकी मृत्यूची नोंद झाली असून, चिंता वाढली आहे. गेल्या 24 देशात तासांत 4 हजार 529 रुग्ण कोरोनामुळे दगावले असून मंगळवारी (दि.18) 4 हजार 329 जणांचा मृत्यू झाला होता. 

देशात नव्यांन वाढ होणा-या रुग्णांची संख्या तीन लाखांच्या खाली आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 2 लाख 67 हजार 334 नव्या रुग्णांची वाढ झाली असून, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 54 लाख 96 हजार 330 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 19 लाख 86 हजार 366 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 3 लाख 89 हजार 851 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. देशात सध्या 32 लाख 26 हजार 719 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 24 तासांत 4 हजार 529 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 2 लाख 83 हजार 248 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.11 टक्के एवढा आहे‌. देशाचा रिकव्हरी रेट 86.23 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 32 कोटी 03 लाख 01 हजार 177 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 20 लाख 08 हजार 296 चाचण्या मंगळवारी (दि.18) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 18 कोटी 58 लाख 09 हजार 302 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.