India Corona Update : गेल्या 24 तासांत 23,285 नवे रुग्ण, 117 रुग्णांचा मृत्यू 

एमपीसी न्यूज – देशात कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसून येत आहे. मागील 24 तासांत देशभरात 23 हजार 285 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर, 117 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह 1 कोटी 13 लाख 08 हजार 846 एवढी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 09 लाख 53 हजार 303 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यापैकी 15 हजार 157 बरे झालेल्या रुग्णांना गेल्या 24 तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या देशात 1 लाख 97 हजार 237 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 22 कोटी 49 लाख 98 हजार 638 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 40 हजार 345 चाचण्या गुरुवारी (दि.11) रोजी करण्यात आल्या आहेत.

 गेल्या 24 तासांत देशात 117 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 58 हजार 306 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.39 टक्के एवढा आहे‌. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85 टक्के एवढं झाले आहे. कोरोना लसीकरण कार्यक्रम अंतर्गत आत्तापर्यंत 2 कोटी 61 लाख 64 हजार 920 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.