Chinchwad News : पती व सास-याकडून विवाहित महिलेचा विनयभंग, बसस्थानकावर घडला प्रकार 

एमपीसी न्यूज – पती व सासरे यांनीच विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाजी चौक, चिंचवड येथील बसस्थानकावर गुरुवारी (दि.20) चारच्या सुमारास हा प्रकार घडला. 

याप्रकरणी पिडित विवाहित महिलेनं शुक्रवारी (दि.21) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिलेचा पती व सासरे यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354, 323, 506, 504, 509, 34 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत विवाहित महिला दवाखान्यातून घरी जाण्यासाठी शिवाजी चौक, चिंचवड येथील बसस्थानकावर थांबली होती. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी पती व सासरे यांनी महिलेला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली व विनयभंग केला. असे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.