Pimpri News : कोंबडी सोबत अश्लील कृत्य करणा-या मुलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कोंबडी सोबत अश्लील कृत्य केल्याप्रकरणी एका मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 मे 2021 रोजी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. 23) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 10 ते 12 वर्ष वयाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने त्याच्या सोशल मिडिया अकाउंटवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यामध्ये मुलाने एका हातात कोंबडी पकडली आहे. त्याने कोंबडी सोबत अश्लील कृत्य केले आहे. 875 के बी साईजचा व्हिडीओ त्याने सोशल मिडीयावर अपलोड केला आहे. हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.