Pimpri News : इमारतीच्या स्टोअर रूम मधून सव्वा पाच लाखांची केबल वायर चोरीला

एमपीसी न्यूज – इमारतीच्या स्टोअर रूम मधून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख 26 हजार रुपयांची केबल वायर चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 30) सकाळी पवार बिल्डींग, मोहननगर, चिंचवड येथे उघडकीस आली.

श्रद्धेश जयप्रकाश पवार (वय 24, रा. चिंचवड) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बिल्डिंगची स्टोअर रूम कुलूप लावून बंद होती. स्टोअर रूमच्या दरवाजाची लोखंडी पट्टी उचकटून अज्ञात चोरट्यांनी 24 मे ते 30 जून या कालावधीत 5 लाख 26 हजार 200 रुपये किमतीचे केबल वायरचे 21 बंडल चोरून नेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.