Bhosari Crime News : कोयत्याच्या धाकाने एकास लुटले, चारजण अटकेत

एमपीसी न्यूज – ‘मी भोसरीचा भाई कुक्या आहे, आम्हाला पार्टी करायची आहे, पैसे दे’, असे म्हणत कोयत्याच्या धाकाने चार जणांनी एकाला लुटले. ही घटना बुधवारी (दि. 29) रात्री पावणेअकरा वाजता आळंदी रस्त्यावरील एस. पी. जी. स्कूलसमोर घडली. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे.

संतोष रामचंद्र मोहिते (वय 46, रा. मॅक्झीन चौक, दिघी) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आदर्श ऊर्फ गोविंद जगताप (वय 20, सद्गुरुनगर ,भोसरी), अजय सुखदेव माने (वय 22, लोहगाव जकातनाका), राम सुनिल पुजारी (वय 19, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), सौरभ संतुराम मोतीरावे (वय 19, रा. संत तुकारामनगर, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुक्या जगताप याने ‘मी भोसरीचा भाई आहे, ओळखले का मला, आम्हाला पार्टी करायची आहे पैसे दे’, असे म्हणत कोयत्याचा धाक दाखवत फिर्यादी यांच्या शर्टच्या खिशातून 400 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर आरोपी माने याने कोयत्याच्या धाकाने फिर्यादी यांच्या पॅन्टच्या खिशातून 300 रुपये काढून घेतले. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून याप्रकरणी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.