Hinjawadi News : बनावट कागपत्रे बनवून तोतया व्यक्ती नोंदणी कार्यालयात उभा करून शासनाची फसवणूक

एमपीसी न्यूज – जागेचे बनावट कागदपत्र तयार करून त्याची नोंदणी करताना तोतया व्यक्तींना उभे केले. तसेच शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 12 मे 2021 ते 8 जुलै 2021 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, हिंजवडी येथे घडली.

दुय्यम निबंधक कार्यालयातील नामदेव मधुकर पाटील (वय 53 रा. नाशिक) यांनी बुधवारी (दि. 29) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उत्तुंग कृष्णराव पाटील, दीपक वसंत चितळकर, वीरेंद्र सिंह ठाकुर, महेश शिंदे आणि नितीन शिंदे (सर्व रा. तळवडे, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील गोडांबेवाडी येथील जमिनीचे दस्त नोंदणी करताना या जमिनीचे मूळ मिळकतधारक प्रीतम सुरेंद्र पाषाणकर व सुरेंद्र रघुनाथ पाषाणकर यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड आरोपीने तयार केले. तसेच जमिनीची नोंद करताना प्रितम पाषणकर यांच्या ऐवजी दीपक वसंत चितळकर आणि सुरेंद्र पाषाणकर यांच्या ऐवजी वीरेंद्र सिंह ठाकूर यांना उभे केले. आरोपींनी आपणच मूळ मालक असल्याचे भासवत दस्ताचे कबुली जबाब नोंदवत आरोपींनी पाषाणकर तसेच शासनाची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.