Sangvi News : मैत्रिणीचा न्यूड व्हिडीओ मित्राने केला व्हायरल

एमपीसी न्यूज – मैत्रिणीला व्हिडीओ कॉल करून तिला निवस्त्र होण्यास सांगून तिचा व्हिडीओ काढून तो मित्र मैत्रिणींना सोशल मीडियावर पाठवून मैत्रिणीची बदनामी केली. याप्रकरणी मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2021 ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत नवी सांगवी येथे घडला.

माढा तालुक्यातील एका 27 वर्षीय तरुणाच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित तरुणी आणि आरोपी हे मित्र आहेत. आरोपीने सप्टेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत फिर्यादीला व्हाट्सअपवर व्हिडीओ कॉल केला. कॉल सुरु असताना त्याने तरुणीला निवस्त्र होण्यास सांगितले. त्यानंतर तरुणीचा निवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ आरोपीना शूट केला. तो व्हिडीओ आरोपीने फिर्यादीच्या मित्र मैत्रिणींना व्हाट्सअपवर पाठवला.

विडिओ व्हायरल करून तरुणीची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 354 (क), 500, 506, माहिती तंत्रज्ञात कायदा कलम 37 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.