Bhosari News : उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून 35 हजारांचा ऐवज चोरीला

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातून 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 17) सकाळी संतोशी अपार्टमेंट, ज्ञानेश्वरी पार्क समोर दिघी रोड भोसरी येथे घडली.

भूषण किशोर दत्तू (वय 26, रा. दिघी रोड, भोसरी. मूळ रा. जळगाव) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे इतर मित्र ज्ञानेश्वरी पार्क समोरील संतोषी अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटमध्ये राहतात. गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी यांचा मित्र वासुदेव महाराज कामावर गेला. कामावर जाताना वासुदेव महाराज याने दार बंद केले नाही. त्यावेळी फिर्यादी आणि त्यांचे मित्र झोपले होते. उघड्या दरवाजावाटे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून लॅपटॉप, दोन मोबाईल फोन, कागदपत्रे आणि सॅक बॅग असा एकूण 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.