Pune News : विवाहितेला लॉजवर नेलं अन् कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार

एमपीसी न्यूज : मार्केटिंगची नोकरी करणाऱ्या एका 25 वर्षीय विवाहित महिलेला काम मिळवून देण्याच्या आमिषाने लॉजवर नेले. तेथे कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध दिले आणि बलात्कार केला. पुणे स्टेशन परिसरातील एका लॉजवर 24 सप्टेंबर रोजी ही घटना घडली. 

याप्रकरणी उरुळी कांचन येथील 25 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार धनंजय जाधव नामक व्यक्तीवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित महिला मार्केटिंगचे काम करते. तिने फेसबुकवर याची जाहिरात केली होती. येथूनच आरोपीने तिचा नंबर घेतला. त्यानंतर तिच्याशी संपर्क साधून मार्केटिंग करत असलेली वस्तू नातेवाईकांना पाहिजे असे सांगितले आणि भेटण्यासाठी बोलावले.

दरम्यान पीडित महिला भेटण्यासाठी आली असता त्याने ग्राहकांना भेटवण्याच्या निमित्ताने स्टेशन परिसरातील लॉजवर तिला नेले. त्याठिकाणी कोल्ड्रिंक्समधून तिला गुंगीचे औषध दिले आणि ती बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर बलात्कार केला. या सर्व घटनेचे त्याने फोटो आणि व्हिडीओ काढले. काही दिवसांनी त्याने हे फोटो पीडितेला पाठवले आणि पुन्हा शरीर संबंध ठेवण्यासाठी सांगितले. तसे न केल्यास हे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.