Pune News : निर्दयी माता ! नवजात बाळाला झुडपात ठेवले

एमपीसी न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाट परिसरात झुडुपात फेकलेल्या अवस्थेत नवजात स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार अजित सणस यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शिंदवणे गावातून घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला झांडामध्ये अर्भक ठेवले होते. गुरुवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास येथून एकजण दुचाकीवरून जात होता. त्यावेळी त्याला रडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्या व्यक्तीने गाडी थांबवून पाहीले असता अर्भक आढळून आले. ही माहिती तत्काळ पोलीसांना दिली.

लोणी काळभोर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून अर्भक बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले आहे. दोन दिवसांचे हे अर्भक आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.