Pimpri News : पुणे, पिंपरी चिंचवड गारठले ; तापमानात मोठी घट 

एमपीसी न्यूज – तापमानात मोठी घट झाल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक चांगलेच गारठले आहेत. आज (दि.24) सकाळी शहरात 10.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. रविवारच्या तुलनेत 7 अंश सेल्सिअस तापमानात घट झाली आहे. रविवारी 17.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. तरी उद्या 9 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता असून दाट धुके असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. 

किमान तापमान सोमवारी पहाटे राज्यात खाली जाण्याची दाट शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात खास करून उत्तर भागात (पुणे,नाशिक व आसपास) प्रभाव जाणवणार, असं पूर्वानुमान भारतीय हवामान खात्याने दिले होते. काही ठिकाणी एक अंकी नोंद होण्याची शक्यता असून, मुंबई व आसपासच्या परिसरात किमान तापमान 14 अंश सेल्सिअस’च्या आसपास असण्याची शक्यता असेल व येते काही दिवस हाच ट्रेंड राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

दरम्यान, पाकिस्तान मधून आलेल्या धुळीच्या वादळाचा प्रभाव काल दिवसभर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दिसून आला. काल दिवसभर शहरवासीयांना सूर्यदर्शन घडले नाही. हवेत मोठ्या प्रमाणावर असलेल्या धुलीकणामुळे अंधुक प्रकाश आणि थंडीमुळे अनेक नागरिकांनी घरातच राहणं पसंत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.