Rahatani News : अल्पवयीन मुलीचा अल्पवयीन मुलाकडून विनयभंग, इन्स्टाग्रामवर झाली होती मैत्री

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरती अलिशान गाड्या व हॉटेलचे फोटो टाकून अल्पवयीन मुलीला प्रभावित केले व तिच्याशी मैत्री केली. मुलीला भेटण्याच्या बहाण्याने घरी जाऊन तिचा विनयभंग केला आहे. फेब्रुवारी 2021 ते 21 मार्च 2022 या कालावधीत रहाटणी व पिंपळे सौदागर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी 17 वर्षीय बालकाला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पिडीत मुलीच्या वडिलांनी सोमवारी (दि.21) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 17 वर्षीय मुलाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरती अलिशान गाड्या व हॉटेलचे फोटो टाकून फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीला प्रभावित केले व तिच्याशी मैत्री केली.

मुलीला भेटण्याच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या घरी जाऊन मुलीला जीवे मारण्याची तर, फिर्यादी यांना बरेवाईट करण्याची धमकी दिली. तसेच, मुलीसोबत अश्लील चाळे करुन ते मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केले. असे फिर्यादीत म्हटले आहे. अल्पवयीन मुलगा ताब्यात असून, अधिक तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.