India Corona Update : देशातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या चार लाखाच्या पुढे 

एमपीसी न्यूज – केरळमध्ये कोरोना रुग्णांची वाढ अधिक होत असल्याने देशात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ दिसून येत आहे. देशात मागील 24 तासांत 42 हजार 618 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून, त्यापैकी केरळमध्ये 29 हजार 322 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या पुन्हा एकदा चार लाखाच्या पुढे गेली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 29 लाख 45 हजार 907 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 21 लाख 001 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 36 हजार 385 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात सध्या 4 लाख 05 हजार 681 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 330 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असून, भारतात आजवर 4 लाख 40 हजार 225 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.33 टक्के एवढा आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.47 टक्के एवढा झाला आहे.
आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात आजवर 52 कोटी 82 लाख 40 हजार 038 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 17 लाख 04 हजार 970 नमूने तपासण्यात आले आहेत.

लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत देशात 67 कोटी 72 लाख 11 हजार 2050 नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 58 लाख 85 हजार 687 नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.