Pimpri News : खडकी कॅन्टोन्मेंटला पुण्याची तर देहूरोडला पिंपरी-चिंचवडची नियमावली लागू

एमपीसी न्यूज – पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला पुणे महापालिकेची तर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला पिंपरी- चिंचवड महापालिकेची नियमावली लागू राहणार आहे. त्यानुसार कॅन्टोन्मेंट हद्दीतील सर्व दुकाने ही आठवडयातील सर्व दिवस (दुकानांची साप्ताहिक सुट्टी वगळून) रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढले आहेत.

पुणे व खडकी छावणी परिषद पुणे व खडकी छावणी परिषद कार्यक्षेत्र पुणे महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने आयुक्त पुणे महानगरपालिका यांचे आदेशातील अटी व शर्तीचे अधिन राहून छावणी परिषद हद्दीतील
सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील.

देहूरोड छावणी परिषद कार्यक्षेत्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने आयुक्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांचे आदेशातील अटी व शर्तीचे अधिन राहून छावणी परिषद हदीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील.

देहूरोडसाठीची नियमावली!

# अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने व आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस पूर्णवेळ सुरू राहतील.

# अत्यावश्यक सेवेची दुकाने व आस्थापना वगळता इतर दुकाने आणि आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. त्या दुकानांची साप्ताहिक सुट्टी वगळून

# शॉपिंग मॉल लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांसाठी रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. नागरिकांनी दोन डोस पूर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे. शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या कामगार व इतर व्यक्तींची रॅपिड चाचणी प्रत्येक पंधरा दिवसांनी करणे बंधनकारक आहे. कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी माॅल व्यवस्थापनाची राहील.

# रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट हे आठवड्यातील सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. घरपोच सेवा रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू राहील. सर्व रेस्टॉरंट, बार, फूड कोर्ट इत्यादींना दर्शनी भागावर  सूचनांचे स्टिकर लावणे बंधनकारक असेल.

# जलतरण तलाव व निकट संपर्कात येणारे सर्व क्रीडाप्रकार वगळून अन्य इनडोअर व आऊटडोअर खेळ हे नियमितपणे सुरू राहतील.

# सार्वजनिक उद्याने आठवड्यातील सर्व दिवस नियमित वेळेत सुरू ठेवता येतील.

#  सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णता बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मुभा राहील.

# स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र, क्लासेस हे सर्व दिवस रात्री आठ वाजेपर्यंत आसक क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. या ठिकाणी प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे लसीकरण किमान एक डोस अनिवार्य आहे.

# व्यायाम शाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर आसनक्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने पूर्वनियोजित वेळेनुसार रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. या ठिकाणी वातानुकूलित एसी सुविधा वापरता येणार नाही.

# सर्व प्रकारची धार्मिक स्थळे राज्य शासनाच्या पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

# रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी असेल व रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत अत्यावश्यक कारण वगळता संचारबंदी लागू राहील.

# अन्य निर्बंध पूर्वीप्रमाणे सुरू राहतील.

पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासाठीची नियमावली!

# अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने व आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस पूर्णवेळ सुरू राहतील.

#सर्व मॉल्स आठवडयातील सर्व दिवस रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, मॉलमध्ये काम करणारे अधिकारी / कर्मचारी यांचे लसीकरण (दोन डोस) व दर 15 दिवसांनी कोविड तपासणी करणे बंधनकारक राहील. तसेच लसीकरणाचे दोन डोस झालेल्या ग्राहकांनाच मॉलमध्ये प्रवेश राहील. कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी मॉल व्यवस्थापनाची राहील.

#रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे आठवडयातील सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. पार्सल सेवा / घरपोच सेवा (होम डिलेव्हरी) रात्री 11 पर्यंत सुरू राहील.

#उद्याने सर्व दिवस सकाळी 6 ते 10 आणि सायंकाळी 4 ते 7 वाजपर्यंत सुरू राहतील.

#क्रीडा – जलतरण व निकट संपर्क येणारे खेळ वगळून इतर सर्व खेळ नियमितपणे सुरू राहतील.
क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पुर्णतः बंद राहतील. मात्र, ऑनलाइन शिक्षणास मुभा राहील.

#स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र / क्लासेस (कोचिंग क्लासेस) हे सर्व दिवस रात्री 8 वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. सदर ठिकाणी प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थींचे लसीकरण (किमान एक डोस) अनिवार्य आहे.

#व्यायामशाळा (जीम), सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार (बाय अपॉईंटमेंट) रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील.

#रात्री 11 वाजेपर्यंत जमावबंदी तसेच रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत (अत्यावश्यक कारण वगळता) संचारबंदी राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.