Hinjawadi Crime News : हातचलाखी करून पळवली सोन्याची अंगठी 

एमपीसी न्यूज – लूटमार करणारे लोक आले असल्याचे सांगून हातचलाखी करत दोघांनी एका ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील सोन्याची अंगठी चोरून नेली. ही घटना अतुलनगर, मारुंजी येथे सोमवारी (दि. 27) रात्री घडली.

सावन कीर्तिकुमार सर्वा (वय 38, रा. सरकार चौक, मारुंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सासरे अतुलनगर येथून जात असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. पुढे लूटमार करणारे लोक आले आहेत. तुमच्या हातातील सोन्याची अंगठी पिशवीत ठेवा, असे आरोपींनी सांगितले. फिर्यादी यांच्या सास-यांच्या हातातील 20 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी बॅगेत ठेवण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून आरोपींनी अंगठी पळवून नेली. सहाय्यक पोलीस फौजदार सपकाळ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.