MIDC Bhosari : मारूंजी व भोसरी एमआयडीसीमधून दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – मांरूजी व भोसरी एमआयडीसी परिसरात अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्या असून याप्रकरणी एमआयडीसी भोसरी व हिंजवडी पोलीस (MIDC Bhosari) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

एमआयडीसी भोसरी येथे कंपनीच्या मोकळ्या जागेत पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरटयांनी भर दिवसा चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 26) मॅट्रिक ऑटो सोल्युशन प्रा. ली. या कंपनीच्या मोकळ्या जागेत घडली.

अमर सुधाकर ढमढेरे (वय 32, रा. मोशी) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र बजरंग अर्जुन सातपुते (रा. पिंपरीगाव) यांनी त्यांची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच 14/डीयु 0356) शुक्रवारी सकाळी आठ वाजता एमआयडीसी भोसरीमधील मॅट्रिक ऑटो सोल्युशन कंपनीच्या मोकळ्या जागेत पार्क केली. सायंकाळी पाच वाजता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Purushottam Maharaj : आई ही धैर्यमूर्ती, करुणामूर्ती आणि क्षमामूर्ती : पुरुषोत्तम महाराज

तर, मारुंजी येथील पूरबजी सुपर मार्केट (MIDC Bhosari) येथे पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना 18 नोव्हेंबर 2021 रोजी उघडकीस आली असून याबाबत 27 ऑगस्ट 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंपालाल लूंबाराम परमार (वय 36, रा. मारुंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एमएच 14/ईके 7062) पूरबजी सुपर मार्केट, मारुंजी येथे पार्क केली होती. तिथून त्यांची दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी नऊ महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.