Sangvi News : सांगवी फाटा येथील हनुमान मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम; कोरोना निर्बंध हटविल्यामुळे भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – सांगवी फाटा येथील हनुमान मंदिरात सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील उत्साहात हनुमान जयंती उत्सव साजरा करण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रम घेत मंडळाने हनुमान जयंती साजरी केली. हजारो भाविकांनी हनुमान मंदिरात दर्शन घेतले. सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी मंडळाचे सदस्य स्वप्नील थोरात, नारायण भिसे, विनोद चलवादि, सुनील शिंदे, पांडुरंग शेट्टी, गौरव घावटे, नितीन खंदारे, निखिल खंदारे, शेखर राजशंकर, विशाल जाधव, श्रेयस सोनकुसरे, गणेश ठोकळे, मनोजकुमार मद्देला, कृष्णा भोसले, के मनोज, गोरक्षनाथ गव्हाणे, सुदर्शन पवार, एमपीसी न्यूजचे अनुप घुंगुर्डे उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करताच जे पहिले मंदिर लागते ते सांगवी फाट्याला असणारे भगवान हनुमान मंदिर. 54 वर्षापूर्वी 20 ऑगस्ट 1968 रोजी या मंदिराची स्थापना झाली आहे. कालांतराने शहर विकासात जुने व पुरातन मंदिर सोडावे लागले. विश्वकर्मा मित्रमंडळ व  नगरसेवक नवनाथ जगताप यांच्या प्रयत्न व पुढाकाराने मंदिराचा 20 ऑगस्ट 2017 रोजी जीर्णोद्धार करण्यात आला. मूर्ती पुरातन व जागृत असून नवीन मंदिर हे सूर्यमुखी मंदिर आहे.

विश्वकर्मा मित्रमंडळ व नगरसेवक नवनाथ जगताप दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त भक्तांना मारुतीरायचे दर्शन, महाप्रसाद, व्यसन मुक्तीचा प्रचार व प्रसार हा मंडळाचा मुख्य हेतू असून त्या संदर्भात जनजागृती करणारे भजन व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करतात. मंदिरात रामनवमी ते हनुमान जयंती ह्या काळात मंदिरामध्ये रामचरित्राचे पारायण करण्यात येते. मंदिराला फुलाची सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात येते. विशेष म्हणजे मंडळामध्ये जे युवा आहेत तेही अतिशय श्रद्धेने आणि सेवा म्हणून मनोभावे सगळे कार्य पार पाडतात. दरवर्षी किमान पाच ते सहा हजार भक्त दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतात.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे मंदिरात होणारे धार्मिक कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने झाले. यावर्षी कोरोन निर्बंध हटविल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नविन हनुमान मंदिर स्थापन करण्यात तो लष्करी ऑफिस समोरील भाग असून त्याला “सांगवी फाटा”असे म्हटले जाते. यावर्षी आठ ते दहा हजार भाविकांनी दर्षन घेतले व प्रसादाचा लाभ घेतला. प्रामुख्याने सीक्यूएई कॉलनी, सांगवी, नवी सांगवी, औंध, पीसीएच कॉलनी व इतर पिंपरी-चिंचवड मधून भाविक दरवर्षी या मंदिरात दर्शनाला येतात. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही हनुमान जयंतीचा कार्यक्रम अतिशय भक्तीमय वातावरणात पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.