Maval News : कै. सौ. मिराबाई भोंगाडे प्राथमिक शाळेतील मुलांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत

एमपीसी न्यूज – नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या कै सौ मिराबाई दशरथ भोंगाडे प्राथमिक विद्यालयातील लहान मुलांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून पुष्पगुच्छ देऊन औक्षण करुन व खाऊ वाटप करत करण्यात आले.

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये बंद होती परंतु कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यामुळे नियमितपणे लहान मुलांच्या प्राथमिक विभागाच्या इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची शाळा पवनानगर येथे सुरू करण्यात आली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थांना प्राचार्या अंजली दौंडे यांच्या हस्ते पुस्तके वाटप करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोर पालन शाळेत करण्यात आले होते. शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांना सॅनिटायझर देऊन, तापमान चेक करून मगच विद्यार्थ्यांना वर्गात सोडण्यात आले. दोन वर्षा नंतर लहान मुलांचा किलबिलट शाळेत सुरु झाला. तसेच सोमवारी (दि. 6) भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण असल्याने शिक्षकांच्या वतीने शाळेत त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी पवनानगर शिक्षण संकुलाच्या प्राचार्या अंजली दौंडे, पर्यवेक्षिका नीला केसकर, काले पवनानगर सरपंच खंडु कालेकर, प्राथमिक विभाग प्रमुख गणेश साठे, पोलिस पाटील अनंता खैरे, वारु ग्रामपंचायत सदस्या निलम साठे, संतोष घरदाळे, पुप्पु कालेकर, विलास भालेराव यांंच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे, कै सौ मिराबाई दशरथ भोंगाडे प्राथमिक विद्यालयाचे पालक सुनिल भोंगाडे यांनी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.