Pimpri News : कामावरून घरी निघालेल्या तरुणाचा मोबाईल आणि बॅग जबरदस्तीने हिसकावली
एमपीसी न्यूज – कामावरून घरी निघालेल्या तरुणाचा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मोबाईल आणि बॅग जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना शनिवारी (दि. 13) रात्री एक वाजता पिंपरी भाजी मंडई पुलावर घडली.
सौरभ राजबहादूर सिंग (वय 21, रा. भाटनगर, पिंपरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी सौरभ सिंग शनिवारी रात्री एक वाजताच्या सुमारास कामावरून घरी जात होते. पिंपरी येथील भाजी मंडई पुलावर आले असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सिंग यांच्या खिशातून दहा हजारांचा मोबाईल फोन आणि 300 रुपयांची बॅग असा एकूण 10 हजार 300 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावला. त्यानंतर सिंग यांच्या हातावर चाकूने मारून त्यांना जखमी करून चोरटे पळून गेले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.