Pune News : पुण्यात महिला अत्याचाराचे सत्र सुरूच, मित्राकडूनच तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : पुण्यात अल्पवयीन मुलीवर 13 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची आणि 6 महिन्यांच्या चिमुरडीवर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. या घटनेतील आरोपींवर कारवाई होते न होते तोच महिला अत्याचाराचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. 

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 22 वर्षीय तरुणीवर तिच्या मित्रानेच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी तरुणी विश्वासाने या मित्राच्या घरी गेली होती. घरात कोणी नसताना आरोपीने घराचा दरवाजा बंद करून तिच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने त्याला विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली.

या सर्व प्रकारानंतर कशीबशी सुटका करून घेत पीडित तरुणीने कुटुंबियांना याची माहिती दिली. त्यानंतर पीडित तरुणीने बिबवेवाडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.