India Corona Update : देशातील कोरोना रुग्णसंख्या साडेतीन कोटी, 24 तासांत 58,097 नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – भारतात गेल्या 24 तासांत नव्या वर्षातील उच्चांकी कोरोना रुग्ण वाढ नोंदविण्यात आली आहे. 24 तासांत 58,097 नवे कोरोना रुग्ण देशात कोरोना आढळले असून, 534 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोना रुग्णसंख्या साडेतीन कोटी झाली असून, ॲक्टिव्ह रुग्ण संख्याही दोन लाखांच्या पुढे गेली आहे. 

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 50 लाख 18 हजार 358 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 43 लाख 21 हजार 803 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 15 हजार 389 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या देशात 2 लाख 14 हजार 004 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 98.27 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 4 लाख 82 हजार 551 कोरोना रुग्ण दगावले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.38 टक्के एवढा झाला आहे. लसीकरणात देश आघाडीवर असून आजवर 147.72 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 96 लाखांहून अधिक नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.