Pune News : ‘महिलांना हनुमान मंदिरात जाण्यासाठी मनाई आहे’ असे म्हणणाऱ्याला बेदम मारहाण

0

एमपीसी न्यूज : ‘ही बाई कोण आहे, हनुमान मंदिरात जाण्यास महिलांना मनाई आहे’ असे बोलणाऱ्या एका व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला लाकडी बांबूने बेदम मारहाण करण्यात आली. भवानी पेठेतील हनुमान मंदिरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. 

याप्रकरणी विशाल तुलशीदास जेदिया (वय 40, हर्मोनी बिल्डींग वानवडी) यांनी फिर्याद दिली असून  जित नावाच्या व्यक्तीविरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

 या प्रकरणी अधिक माहिती अशी की, मंगळवारी हनुमान जयंती होती. फिर्यादी हे भवानी पेठेतील एका हनुमान मंदिरासमोर उभे होते. यावेळी हनुमान मंदिरात अचानक एक महिला आत गेली. त्यामुळे फिर्यादी हे त्यांच्या बहिणीला ‘ही बाई कोण आहे, हनुमान मंदिरात जाण्यास महिलांना मनाई आहे’ असे बोलत असतानाच त्यांच्या शेजारी उभ्या असणार्‍या एका व्यक्तीने त्यांना शिवीगाळ.

दरम्यान फिर्यादी व आरोपी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली व त्याचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी व फिर्यादीचे पत्नीला बांबूने मारहाण करून जखमी केले आहे. खडक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment