Pune News : शिवसेना नेत्याने बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या तरुणीचा ‘एफबी लाईव्ह’ करून आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार केल्याची तक्रार देणाऱ्या पीडित तरुणीने फेसबुक लाईव्ह करून आत्महत्या चा प्रयत्‍न केला. डेक्कन परिसरातील एका हॉटेलमध्ये शनिवारी हा प्रकार घडला. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी पिडीत तरुणीने फेसबुक लाईव्ह केल्यामुळे पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन पीडित तरुणीची सुटका केली. 

शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार या तरुणीने दिली होती. त्यानुसार पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 16 फेब्रुवारी रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

दरम्यान या 24 वर्षीय पीडित तरुणीने शनिवारी सकाळी डेक्कन परिसरातील एका हॉटेलमध्ये जाऊन आत्महत्त्या करत असल्याचं फेसबुक लाइव्ह द्वारे सांगितलं होतं. हा प्रकार समजल्यानंतर डेक्कन पोलिस आणि शिवाजीनगर पुणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना पीडित तरुणी सुखरूप असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. तिची समजूत घातली आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं तिच्या लक्षात आणून दिलं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.