Social Media Crime : फेक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित केल्याबाबत गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – फेक अकाउंट बनवून त्यावर महिलेचे फोटो वापरून व्हिडीओ (Social Media Crime) तयार केला आणि तो महिलेला पाठवला. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 एप्रिल ते 10 मे 2022 या कालावधीत घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी (दि. 10) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alandi Crime News : दारू पिताना झालेल्या भांडणातून एकाचा गळा दाबून खून; तिघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने इंस्टाग्रामवर फेक अकाउंट (Social Media Crime) बनवले. त्यावर फिर्यादी महिलेचे फोटो वापरून व्हिडीओ तयार केला आणि तो पाठवला. याप्रकरणी सन 2008 चा सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (सी) (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.