Hinjawadi News : पोलीस असल्याची बतावणी करून व्यक्तीचे अपहरण

एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करून अनोळखी इसमाने एका व्यक्तीचे त्याच्या राहत्या घरातून अपहरण केले. हा प्रकार बुधवारी (दि. 17) रात्री हिंजवडी परिसरात घडला.

याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने अनोळखी व्यक्तीच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती फिर्यादी यांच्या घरी आला. त्याने आपण पोलीस असल्याचे फिर्यादी यांना सांगितले आणि त्यांच्या 40 वर्षीय पतीला त्याच्यासोबत पळवून नेले.

फिर्यादी यांनी आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाची कडी बाहेरून लावली. फिर्यादी व पोलिसांनी याप्रकरणाची खात्री करून अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.