Wakad News : ज्येष्ठ नागरिकाची सव्वा दोन लाखांची ऑनलाइन फसवणूक

एमपीसी न्यूज – एसबीआय बँकेचे योनो अकाउंट व डेबिट कार्ड ब्लॉक होणार असल्याचे मेसेज पाठवून त्याद्वारे गोपनीय माहिती घेत ज्येष्ठ नागरिकाची 2 लाख 24 हजारांची फसवणूक केली. ही घटना 28 डिसेंबर रोजी काळेवाडी फाटा, वाकड येथे घडली.

गिरीवलकुमार रघुनाथ प्रसाद सोडानी (वय 67, रा. काळेवाडी फाटा, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8100699292 आणि 7604079146 या मोबाईल क्रमांक धारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 7604079146 या क्रमांकावरून एक मेसेज आला. त्यामध्ये फिर्यादी यांचे एसबीआय बँकेचे योनो अकाउंट व डेबिट कार्ड ब्लॉक होणार आहे, ते पॅन कार्ड नंबरने अपडेट करून घ्या, असे सांगण्यात आले.

फिर्यादी यांनी त्या मेसेज मधील लिंकवर क्लिक केली आणि पूर्ण माहिती भरली. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून गोपनीय माहिती घेण्यात आली. त्याआधारे फिर्यादी यांच्या बँक खात्यातून तीन टप्प्यांमध्ये एकूण दोन लाख 24 हजार 799 रुपये काढून घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.