Pimpri News : दिल्लीतील “29 व्या कन्व्हर्जन्स इंडिया 2022” एक्स्पोमध्ये पिंपरी-चिंचवडचा सहभाग

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची दिली माहिती

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत भारत सरकारचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय निर्माण भवन, नवी दिल्ली यांच्यावतीने आयोजित “सातव्या स्मार्ट सिटीज इंडिया 2022” आणि “29 व्या कन्व्हर्जन्स इंडिया 2022” एक्स्पोमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीने सहभाग नोंदविला आहे. सिटी लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये शहरी स्मार्ट सिटी सोल्यूशन्स व स्मार्ट सिटीज इन्फ्रास्ट्रक्चर यासंदर्भात माहिती देण्यात आली.

23 ते 25 मार्च 2022 या दरम्यान प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे वाणिज्य आणि वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) द्वारे देशातील 100 स्मार्ट सिटींसाठी एक्सो भरविण्यात आला आहे. एक्स्पोमध्ये, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी प्रकल्प, उपक्रम आणि उपलब्धी दाखवण्यासाठी डिस्प्ले स्टॉल लावण्यात आला आहे. स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण हे महापालिकेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.

कोविड काळात प्रशासनाची महत्त्वाची भूमिका, माहिती गोळा करण्यासाठी अनेक नवकल्पनांचा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा केलेला वापर, द्वि-मार्गी संप्रेषणाची तरतूद, व्यवस्थापन आणि समन्वय, भविष्य सूचक मॉडेलिंग आणि सज्जता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसेच कॉर्पोरेट क्षेत्रांना होणारा तंत्रज्ञानाचा फायदा, स्टार्टअप्स मिळणारे प्राधान्य, नागरिकांना राहण्यायोग्य आणि शाश्वत शहरे निर्माण करण्यासाठी योग्य उपाययोजना, स्मार्ट शहरांच्या संकल्पनेतील सर्वोत्तम पद्धती आणि मॉडेल्सचा सन्मान करून आपली शहरे राहण्यायोग्य, शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवून प्रभाव पाडणाऱ्या प्रकल्पांची माहिती यावेळी देण्यात आली.

तसेच, सिटी लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये शहरी स्मार्ट सिटी सोल्यूशन्स व स्मार्ट सिटीज इन्फ्रास्ट्रक्चर यासंदर्भातही सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांनी सहभागी शहरांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर, स्मार्ट सिटी फ्रेमवर्कसह स्मार्ट आयसीटी, स्मार्ट एनर्जी, बिल्डिंग्स, ट्रान्सपोर्ट, वॉटर आणि क्लीन इंडिया इ. इंडस्ट्री यांची माहिती देण्यात आली.

शहरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी सखोल संवाद आणि अधिक व्यावहारिक दृष्टीकोन आणि स्मार्ट शहरे प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने काम करणाऱ्या संस्थांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ प्रदान होण्यासाठी तीन दिवसीय एक्स्पो भरविण्यात आला आहे. यामध्ये, देशभरातून 1 हजारहून अधिक स्टॉल लावण्यात आले आहे. मोठया  संख्येने देश – विदेशातील उद्योग संस्था, महाविद्यालये, उद्योग क्षेत्रातील नामवंत कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून पिंपरी-चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीच्या स्टॉलला भेट देवून माहिती घेत आहेत. 25 मार्च 2022 रोजी स्मार्ट सिटीज इंडिया अवॉर्ड्ससाठी नामांकन घोषित करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.