Chakan News : धक्कादायक ! साडेचार वर्षीय मुलीवर लैंगिक आत्याचार, आरोपी इसम अटकेत 

एमपीसी न्यूज – साडेचार वर्षीय मुलीवर लैंगिक आत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी 32 वर्षीय आरोपी इसमाला अटक करण्यात आली आहे. 11 ते 12 फेब्रुवारी 2022 दरम्यान आंबेठाण, खेड येथे हा प्रकार घडला. 

योगेश गजानन रुपनर (वय 32, रा. सिद्धार्थ नगर, आंबेठाण, खेड) असे अटक आरोपीचे नाव आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने रविवारी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांच्या साडेचार वर्षीय अल्पवयीन मुलीला आरोपीने स्वतःच्या घरी बोलावले. आरोपीने मुलीवर लैंगिक आत्याचार व हामला केला असे फिर्यादीत नमूद केले आहे. आरोपी विरोधात बाल लैंगिक आत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अटकेत असून, चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.