Vadgaon Maval News : वडगाव मधील शिबिरात 73 जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज – सुषमा सुनील बाफना यांच्या पाचव्या स्मृति दिनानिमित्त स्व. सोहनलाल हिराचंद बाफना चॅरिटेबल ट्रस्ट, वडगाव जैन सकल संघ व लायन्स क्लब ऑफ वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. रविवारी (दि. 2) वडगाव मावळ मधील जैन स्थानक येथे घेण्यात आलेल्या शिबिरात 73 जणांनी रक्तदान केले.

वडगांव मधील रक्तदान शिबिरात 73 जणांनी सहभाग घेतला.स्व, सोहनलाल हिराचंद  बाफना चॅरिटेबल ट्रस्ट, वडगाव जैन सकल संघ व लायन्स क्लब ऑफ वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सौ,सुषमा सुनील बाफना यांच्या पाचव्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिर वडगाव जैन स्थानक येथे दि 2 जानेवारी 2022रोजी पार पडले.

कार्यक्रमाचे उदघाटन माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी केले अध्यक्ष स्थानी गुलाबराव म्हाळस्कर माजी सभापती मावळ होते.डॉ,सुनील बाफना यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

ह्या प्रसंगी अनंता कुडे अध्यक्ष भाजपा वडगाव, नगरसेवक किरण म्हाळस्कर, विजय जाधव,प्रसाद पिंगळे,भाजपा वडगावचे माजी अध्यक्ष किरण भिलारे, माजी सरपंच नितीन कुडे, प्रमोद म्हाळस्कर आदी मान्यवर उस्थितीत होते.

73 जणांनी रक्त दान केले प्रत्येक रक्त दात्यास आकर्षक  पॉवर  बँक /ब्लूटूथ हेडफोनभेट स्वरूपात दिले. लायन्स क्लबचे अध्यक्ष दिलीप मुथा, भूषण मुथा,अमोल मुथा, नंदकिशोर गाडे,संतोष चेट्टी,बाळासाहेब बोरावके जैन सकल संघाचेअध्यक्ष चंपलाल मुथा,अतिश कर्णावट,प्रीतम बाफना प्रदीप बाफना,सुभाष मुथा,उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप भास्करराव म्हाळस्कर प्रभारी मावळ भाजपा यांनी केला. तर कार्यक्रमाचे संयोजन डॉ सुनील बाफना, वडगाव शहर भाजप व्यापारी आघाडी अध्यक्ष चेतन बाफना, मनोज बाफना, हर्षल बाफना, नवीन बाफना, आदेश बाफना,  प्रज्वल बाफना, प्रथम बाफना यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.