Talegaon News : तरुणीला धमकावून तिच्या घरासमोर रोमिओचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – तरुणीने लग्नासाठी स्पष्ट नकार दिला असतानाही तिचा पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन केले. तसेच तरुणीच्या घरासमोर जाऊन तिला धमकावत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एका रोमिओच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 15 जुलै 2021 ते 1 जानेवारी 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडला.

पीडित तरुणीने याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दत्ता अंकुश वाशिवले (रा. कोथरूड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने आरोपीला लग्नास स्पष्ट नकार दिला होता. तरीदेखील आरोपीने फिर्यादी तरुणी काम करत असलेल्या ठिकाणी तसेच तिच्या घरी पाठीमागे येऊन वारंवार पाठलाग केला. ‘मला आयुष्यात तूच हवी आहे, मी तुझ्या वाचून राहू शकत नाही’, असे म्हणून आरोपीने फिर्यादीला धमकावले. तसेच फिर्यादीच्या घरासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक झोल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.