Moshi Crime News : अश्लील हावभाव करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – खिडकीमधून बघत अश्लील हावभाव करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. मोशी प्राधिकरण, पुणे येथे शनिवारी (दि.04) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

तुषार शिवाजी पांचाळ (वय 28, रा. संतनगर, मोशी प्राधिकरण, पुणे मुळगाव वासनगाव, लातूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विवाहित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार पांचाळ आपल्या अंगावरील सर्व कपडे काढून तो शेजारी राहत असलेल्या महिलेकडे किचनच्या खिडकीमधून पाहत अश्लील हावभाव करत होता. या घटनेची माहिती महिला फिर्यादीने आपल्या पतिला दिली. सोबतच तिसर्‍या मजल्यावर राहत असलेल्या भाडेकरूंना देखील याबाबत सांगून बोलावून घेतले. मात्र तरीही आरोपी तुषार पांचाळ हा सर्वांसमोर पुन्हा अश्लिल हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत होता.

त्यामुळे आरोपी तुषार पांचाळ याच्या विरोधात फिर्यादीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी आरोपीस अटक केली आहे. याबाबत भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.