Pimpri News : पिंपरी आणि चिखलीत चोऱ्या; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – पिंपरी आणि चिखली परीसरात दोन ठीकाणी चो-या झाल्या. यात अज्ञात चोरट्यांनी 3 लाख 42 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. याप्रकरणी मंगळवारी (दि. 28) पिंपरी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

कुणाल मंगेश सातव (वय 35, रा. सातव निवास, पिंपर गाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. फिर्यादी सातव यांना आपल्या व्यावसायासाठी पाईप लागत असल्याने 2 लाख 14 हजार 480 रुपये किमतीचे 2 हजार 653 किलोचे पाईप घराजवळ आणून ठेवल होते. अज्ञात चोरट्यांनी ते चोरून नेले. ही घटना 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी पिंपरी गाव येथे घडली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

अमित विनायक मेश्राम (रा. कृष्णानगर, शांती सदन सोसायटी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, मेश्राम यांनी त्यांची एक लाख 30 हजार रुपये कीमतीची दुचाकी 24 सप्टेंबर रोजी सकाळी सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरुन नेली. हा प्रकार 28 सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.