Pune Covid-19 : धोका अजून संपला नाही, जिल्ह्यात बुधवारी 12 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तर मृत्यूसंख्येतही आता वाढ होऊ लागली आहे. बुधवारी पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील नऊ मृत्यू आहेत. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात 12 हजार 633 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केले जात आहे. 

जिल्ह्यातील दिवसांतील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 6 हजार 441 नवे रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 3 हजार 505, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 1 हजार 918, नगरपालिका हद्दीत 460 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 309 नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये शहरातील नऊ मृत्यूबरोबरच जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एक मृत्यू आहे.

दिवसभरात 8 हजार 357 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 4 हजार 857 जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील 2 हजार 64, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एक हजार 9, नगरपालिका हद्दीतील 253 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील 174 जण आहेत. दरम्यान जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा पाऊण लाखाच्या घरात पोचला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.