Vehicle Theft : चाकण, भोसरी, हिंजवडी, चिखली मधून आठ दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण परिसरातून तीन, भोसरी आणि चिखली परिसरातून प्रत्येकी दोन, हिंजवडी परिसरातून एक अशा आठ दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वाहन चोरट्यांनी शहरात उच्छाद मांडला आहे. वाहन चोरी प्रकरणी रविवारी (दि. 12) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

कडाचीवाडी आळंदी घाटातून एक दुचाकी भर दिवसा चोरीला गेली. कडाचीवाडी गावातून एका घरासमोरून रात्रीच्या वेळी एक दुचाकी चोरीला गेली. तर महाळुंगे येथील एचपी चौकातील एका हॉटेल समोरून एक दुचाकी दिवसभराच्या कालावधीत चोरीला गेली. याप्रकरणी अनुक्रमे ज्ञानेश्वर नागोराव वानखेडे (वय 31, रा. कुरुळी, ता. खेड), गणेश दशरथ ठाकूर (वय 36, रा. कडाचीवाडी, ता. खेड), गौतम जगदेवराव खंडारे (वय 44, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आळंदी रोड भोसरी येथील महाराष्ट्र चौकातून एक तर भोसरी उड्डाणपुलाच्या खालून एक अशा दोन दुचाकी भोसरी मधून चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी अनुक्रमे राहुल उमाकांत कांबळे (वय 24, रा. आळंदी रोड, भोसरी) आणि हर्षद संतोष रायमल (वय 24, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सुमीत संजय मेहरे (वय 32, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 35 हजारांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली.

चिखली पोलिस ठाण्यात सुभाष बबन बेन्ने (वय 34, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली ) यांनी दोन दुचाकी चोरीची फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने 11 सप्टेंबर रोजी राहत्या घराच्या खाली सार्वजनीक रस्त्यावर दुचाकी पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुचाकी चोरून नेल्या.

इको गाडीचा सायलेंसर चोरीला 

 कंपनीच्या समोर उभ्या केलेल्या इको गाडीचा सायलेन्सर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान एमआयडीसी भोसरी येथील कुदळे इंजिनिअरिंग या कंपनीसमोर ही घटना घडली. ज्ञानेश्वर शंकर नलावडे (वय 48, रा. आळंदी रस्ता) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस फिर्याद दिली आहे.

कार मधून दोन मोबाईल फोन चोरीला

कौस्तुभ युवराज अहिरराव (वय 34, रा. बाणेर) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची कार 11 सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास बंद पडलेल्या किनले कंपनीजवळ पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या कार मधून 28 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन चोरून नेले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.