Chakan News : ‘तुझ्या नव-यामुळे माझी व बायकोची भांडणे झाली,’ असे म्हणून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – ‘तुझ्या नव-यामुळे माझी व बायकोची भांडणे झाली,’ असे म्हणून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी दोन इसमांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. रासे गावच्या हद्दीत गुरूवारी (दि.07) ही घटना घडली.

याप्रकरणी पिडीत महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दोन आरोपी इसमां विरोधात भारतीय दंड विधान कलम 354, 323, 504, 506, 34 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘तुझ्या नव-यामुळे माझी बायको व माझ्यात भांडणे झाली, आता तुला मी सोडणार नाही. तुला तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही,’ असे म्हणून विनयभंग केला. फिर्यादी यांचे दिर, सासु त्याठिकाणी आल्यावर आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.