Bhosari News : भोसरी, हिंजवडीत विनयभंगाच्या दोन घटना

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी मधील एका कंपनीत आणि हिंजवडी येथील एका सोसायटीत महिलांचे विनयभंग केल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. याप्रकरणी रविवारी (दि. 24) एमआयडीसी भोसरी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात 32 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण बोरसे या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला एमआयडीसी भोसरी मधील एलायंस कंट्रोल्स प्रा ली या कंपनीत काम करत असताना आरोपीने तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार 13 जानेवारी रोजी घडला असून याप्रकरणी तीन महिन्यानंतर महिलेने फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

हिंजवडी पोलीस ठाण्यात 40 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू कतरी (रा. भूमकर चौक, हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला आरोपीच्या घरी घरकाम करतात. रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास फिर्यादी आरोपीच्या घरी घरकाम करत असताना आरोपीने फिर्यादीकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. त्यानंतर फिर्यादीचा हात आणि पदर ओढून त्यांच्याशी गैरवर्तन केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.